Mon. Sep 27th, 2021

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका… तरूणीने उचललं ‘हे’ पाऊल!

‘लिव्ह इन रिलेशन’ शिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने लग्नास नकार दिल्याचा राग आल्याने तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सांगवी परिसरात घडलीय.

मृत तरुणी गेल्या तीन वर्षांपासून आयटी कंपनी काम करणा-या तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होती. तरुणाचं नुकतंच लग्न ठरल्यामुळे तरुणी निराश झाली होती. ‘माझ्याशी लग्न कर’ अस वारंवार सांगूनही तरुणाकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याच कारणातून तिने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झालीय.

ज्या तरुणांसोबत मुलगी राहायची त्याच घराच्या टेरेसवर जाऊन तिने तिथून उडी मारली. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा अखेर मृत्यू झाला.

गेल्या आठवड्यात अशाच प्रकरणातून सांगवी परिसरातच लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या मैत्रिणीवर चाकू हल्ला केला होत. स्वतःच्या हाताच्या नसा कापून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणातील दोघांवरही उपचार सुरु आहेत आणि आता ही दुसरी घटना समोर आल्याने ‘लिव्ह इन’ चा पुन्हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *