Fri. Jul 30th, 2021

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख!

मराठी अधिकारी मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख असणार आहे, लेफ्टनंट जनरल देवराज अंबु 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी सेवाज्येष्ठतेनुसार नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली. जनरल नरवणे हे लष्कर प्रमुखांनतर सर्वात ज्येष्ठ अधिकारी असल्याने लष्कराचे प्रमुख होण्याची दाट शक्यता आहे.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे?

नरवणे हे गेल्या 37 वर्षांपासून सैन्यात आहेत.

त्यांनी इन्फंण्ट्री ब्रिगेडचं नेतृत्वही केलंय.

नरवणे हे मूळचे पुण्याचे आहेत.

ते NDA तसंच डेहराडूनच्या इंडियन मिलटरी अकॅडमीत त्यांनी प्रशिक्षण घेतलं.

1980 मध्ये ते शीख लाईट इन्फण्ट्रीतून लष्करात दाखल झाले.

जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी राश्ट्रीय रायफल प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडलीय.

बालाकोट air strike च्या मोहिमेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

ते आसाम रायफल्सचे महानिरीक्षकही होते.

म्यानमानरमध्ये ते डिफेन्स अटॅची म्हणून कार्यरत होते.

भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर नरवणे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *