लेबर कॉलनीत ३३८ घरं पाडण्याचं काम सुरू

औरंगाबादच्या लेबर कॉलनी परिसरात मोडकळीस आलेली घरं जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाई सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, या ठिकाणी ३३८ घरं पाडण्यात येणार आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाचशे पोलीस आणि दीडशे अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कारवाईसाठी ५० जेसीबीसह अनेक कामगारांना पाचारण करण्यात आलं आहे. यावेळी सदस्यांनी पुनर्वसनाची मागणी केली.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ २० एकरात उभारण्यात आलेली आणि सुमारे ६५ वर्ष जुनी असलेली लेबर कॉलनीचा ताबा मिळविण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. लेबर कॉलनीत एकूण ३३८ घरं होती. लेबर कॉलनी पाडापाडी नियोजनाबाबत सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात महापालिका, पोलिस प्रशासनासोबत इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कारवाईसाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. परिसरातील रस्ते बंद करण्यात आली आहेत. वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
औरंगाबाद – लेबर कॉलनीत ३३८ घरं पाडण्याचं काम सुरू
- मोडकळीस आलेली घरं जमीनदोस्त करण्यास सुरुवात.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पाडकाम सुरू.
- काहीजण घरे सोडण्याच्या तयारीत आहेत.
- गेल्या सहा महिन्यांपासून काही रहिवाशांचा विरोध.
- लेबर कॉलनीत ५० जेसीबी दाखल.
- परिसरात जमावबंदी लागू.
- कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाचशे पोलिसांचा बंदोबस्त.
- जिल्हा प्रशासन जागा आपल्या ताब्यात घेत आहे.
- २० एकर सरकारी जागेवर बांधकाम.
- १९५३ मध्ये शासनाच्या विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली.