लोणावळ्याच्या नगराध्यक्षांच्या घराबाहेर ठेवला तिरडीचा उतारा
जय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा
लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधवांच्या घराबाहेर तिरडीचा उतारा ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव बाहेर गावी गेले असतांना हा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून, या तिरडी करणीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
एकीकडे अंधश्रद्धा निर्मुलनाकरता सामाजिक संघटना आणि प्रशासन कंबर कसून प्रयत्न करत असताना अशा घटनांमुळे अंधश्रद्धांना खतपाणीच मिळत आहे.