Mon. Aug 19th, 2019

वसईत एका व्यापाऱ्याला गावगुंडांनी चाटायला लावली थुंकी!

सोशल मीडियावर वसईतील व्हिडीओ वायरल होत आहे. यात एका व्यापाऱ्याला खुर्चीवर बसून स्वतःच्या हातावर थुंकायला सांगतात आणि परत तेच चाटायला सांगतात.

0Shares

सोशल मीडियावर वसईतील एका व्यापाऱ्यांचा मारहाण होतानाचा व्हिडीओ वायरल होत आहे. या व्हिडिओत एका व्यापाऱ्याला दोन ते तीन जण बेदम मारहाण करत असून त्याला खुर्चीवर बसून स्वतःच्या हातावर थुंकायला सांगतात आणि परत तेच चाटायला सांगतात. या व्हिडीओमुळे वसईत खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर वसईतील एका व्यापाऱ्यांचा मारहाण होतानाचा व्हिडीओ वायरल होत आहे.

या व्हिडिओत एका व्यापाऱ्याला दोन ते तीन जण बेदम मारहाण करत असून त्याला खुर्चीवर बसून स्वतःच्या हातावर थुंकायला सांगतात आणि परत तेच चाटायला सांगतात.

ही सदरची घटना ही उमेलमान वसई परिसरातील आहे. या संदर्भात वसई माणिकपूर पोलीस स्थानकात चार अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

या व्हिडिओत मारखात असलेला व्यक्ती अनुप सिंग हा पालघर मध्ये राहणारा असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. तो बांधकामाची छोटी मोठी कामे करतो.

त्याला याच विभागात राहणाऱ्या सूर्या आणि इतर तीन जणांनी मारहाण करून त्याच्याकडील 25 हजार रुपये आणि मोबाईल चोराला. पोलीस अद्याप आरोपीचा शोध घेत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *