Tue. May 17th, 2022

वांद्र्यात ५ मजली इमारत कोसळली, अडकलेल्या ६ नागरिकांची सुटका

वांद्रे पूर्व परिसरातील बेहरामपाडा येथील प्राध्यापक अनंत काणेकर मार्गावरील रझा मशिदीजवळ असलेली पाच मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्याची मोहीम हाती घेतली. हि घटना सुमारे दुपारी ४ च्या दरम्यान घडल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
घटनेची अधिक माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ६ रुग्णवाहिका आणि १ रेस्क्यू व्हॅन तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरु करून ढिगाऱ्या खाली अडकलेल्या ६ लोकांची सुखरूप सुटका करण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसून १५ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

1 thought on “वांद्र्यात ५ मजली इमारत कोसळली, अडकलेल्या ६ नागरिकांची सुटका

  1. our ear. She put the shell to her ear and screamed. There was a hermit crab inside and it pinched her ear. She never wants to go back! LoL I know this is completely off topic but I had to tell someone!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.