Tue. Jun 18th, 2019

Viral फोटोतल्या ‘त्या’ मुलाचा शाळेकडून सत्कार…

196Shares

काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांच्या सोशल पोस्ट्वर एका लहान मुलाचा फोटो वायरल झाला होता. या फोटोमधल्या मुलाच्या हातामध्ये एक कोंबडीचं पिल्लू दिसत आहे, त्या पिल्लाला झालेल्या दुखापतीसाठी तो त्याच्या घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहाचतो. तेही इवल्याश्या हातांमध्ये पैशाची नोट धरलेला, चेहऱ्यावर घाबरलेले भाव आणि पिल्लाची काळजी त्याच्याकडे पाहून स्पष्ट दिसते. या मिझोरामी मुलाच्या भूतदयेचा त्याच्या शाळेने सन्मान करत त्याचा शाल, प्रशस्तीपत्रक, फुलांचा गुच्छ देत सत्कार केला आहे. अशा सत्कारांनी मुलांच्या गुणांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल हे नक्की.

फोटो वायरल होण्यामागचे नेमके कारण?

एखादे कॉमेडी, घाबरवणारे, शोक व्यक्त करणारे पोस्ट्स सोशल मिडीयावर सर्रास पाहायला मिळतात.

त्यातले काही सोशिअल विचार मांडणारे असतात, तर काही विचार करायला भाग पाडणारे असतात.

‘डेरेक सी लालचनहिमा’ या मिझोरामी मुलाचा फोटो काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता.

इवल्याश्या हातामध्ये कोंबडीचे पिल्लू हातात घेतलेला दिसत आहे.

त्या पिल्लाला डेरेक कडून दुखापत झाली होती आणि त्यासाठी तो त्याच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हातात पैशांची नोट पकडलेला दिसतोय.

इवल्याश्या वयामध्ये त्या पिल्लासाठी दाखवलेली भूतदया खरंतर वाखाण्याजोगी आहे.

याची दखल डेरेकच्या शाळेने घेतली आहे, वायरल झालेल्या या डेरेकच्या फोटोमुळे तो प्रसिद्ध झाला तरी त्याच्या या कृतीचं विशेष कौतुक आहे.

त्यासाठीच डेरेकच्या शाळेने त्याचा ‘मिझोरामी’ अंदाजात सत्कार केला.

शाळेतर्फे प्रशस्तीपत्रक, फुलांचा गुच्छ, शाल देत सत्कार केला आहे, त्याच्या सत्कारावेळेस काढलेला फोटोही त्याच्या आनंदाला व्यक्त करत आहे.

196Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *