Thu. Jun 20th, 2019

वायु चक्रीवादळाच्या भितीनं चीनची दहा जहाजं भारताच्या आश्रयाला

0Shares

वायु चक्रीवादळाच्या भितीनं चीनची दहा जहाजं भारताच्या आश्रयाला आली आहेत. या जहाजांना रत्नागिरीच्या बंदरात आश्रय देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक महानिरीक्षक के आर सुरेश यांनी याबाबत माहिती दिली आहे.राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे तर अजून काही भाग पावसाच्या प्रतिक्षेत असताना हवामानखात्याकडून भारतीय समुद्रकिनाऱ्याच्या काही भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागांना धोका अधिक असल्याचे सांगितले आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. वायु चक्रीवादळाच्या भितीनं चीनची दहा जहाजं भारताच्या आश्रयाला आली असल्याचं सांगीतलं जात आहे.

वायु चक्रीवादळाच्या भितीने चीनची जहाजं भारतात

वायु चक्रीवादळाच्या भितीनं चीनची दहा जहाजं भारताच्या आश्रयाला आली आहेत.

भारतीय तटरक्षक विभागाने या दहा जहाजांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत राहण्यास परवानगी दिली आहे.

हवामान खात्याच्या मते वायू हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारी भागास १३ जून रोजी धडकण्याची शक्यता आहे.

तर आगामी २४ तासांमध्ये हे वादळ अधिकच गतीमान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ते गुजरातच्या वेरावलजवळ धडकू शकते, भारतीय किनारी भागास धडकते वेळी या वादळाची गती 110 ते 135 किलोमीटर प्रतीतास असू शकते.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: