Sun. Aug 18th, 2019

विजय मल्ल्याला पाहताच भारतीयांचे ‘चौर है, चौर है’ चे नारे

0Shares

डबघाईला गेलेल्या किंगफिशर या विमान कंपनीचा मालक विजय मल्ल्या भारतातल्या बँकांचे 9 हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळाला. सध्या विजय मल्ल्या जामिनावर मुक्त आहे. विजय मल्ल्याला भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागतं आहे. मल्ल्या रविवारी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात रंगलेला क्रिकेट सामना पाहण्यासाठी आला होता. विविध हिंदी चित्रपटांतील दृश्यांचा आधार घेत ट्विटरवर दिवसभर विजय मल्ल्याचे ट्रोलिंग सुरूच आहे.

भारतीयांचा मल्यावर रोष

किंगफिशर एअरलाइन्सचा कर्जबुडव्या मालक विजय मल्ल्याला भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

मल्ल्या रविवारी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात रंगलेला क्रिकेट सामना पाहण्यास त्याचा मुलगा सिद्धार्थ याच्याबरोबर आला होता.

ओव्हल मैदानातून सामना पाहून बाहेर पडत असताना भारतीयांनी त्याच्या रोषाला सामोर जावं लागलं आहे.

भारतीयांनी मल्ल्याला पाहताचं ‘चौर है, चौर है’ चे नारे द्यायला सुरूवात केली आहे.

‘खरा मर्द असशील तर देशाची माफी माग.’ असं ही त्याला सुनावण्यात आली आहे.

विजय मल्ल्याने मुलासमवेत काढलेला आपला फोटा ट्विट केल्याने तो चांगलाचं ट्रोल केले गेले.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *