Fri. Jul 30th, 2021

विदर्भावर दुबार पेरणीचं संकट!

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे आणि नाशिक वगळता राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालाय. मराठवाड्यात सरासरीपेक्षा 31%, तर विदर्भात 30% कमी पाऊस झाला आहे़.

काय आहे परिस्थिती?

पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नसल्याने मराठवा आणि विदर्भात सध्या मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती नाही़.

मराठवाडा आणि विदर्भातील खरीप पेरण्यंवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे़.

त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं आहे.

संपूर्ण विदर्भात सरासरीच्या 30% कमी पाऊस झाला.

यवतमाळ (-51%),

वर्धा (-43%),

वाशिम (-41%),

अमरावती (-39%),

भंडारा (-31%),

अकोला (-28%),

चंद्रपूर (-23%),

गोंदिया (-37%),

नागपूर (-26%),

गडचिरोली (-20%)

जिल्ह्यांमध्ये पावसाची नितांत गरज आहे़ केवळ बुलडाणा (-3%) जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *