Sun. Aug 1st, 2021

विरोधकांचा सरकारच्या चहा पाण्यावर बहिष्कार, अधिवेशनात हे मुद्दे उचलणार

विरोधकांनी सरकारच्या चहा पाण्यावर बहिष्कार टाकला आहे.पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची बैठक झाली असून या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, आमदार कपिल पाटील, आमदार भास्करराव जाधव,आमदार हेमंत टकले,आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख,विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, आमदार रामहरी रुपनवार उपस्थित होते.  या बैठकीत सरकारला कोणत्या मुद्यांवर वेठीस धरलं जाणार याबद्दल चर्चा करण्यात आली.

अधिवेशनात हे मुद्दे  उचलून धरणार  विरोधक

राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही.  त्यामुळे दुष्काळी स्थितीत  वाढ आहे ,सरकार फक्त दुष्काळ जाहीर करत उपाय योजना काही नाहीत
विरोधक दुष्काळ मुद्द्यावर सरकारला घेरणार आहेत.

कर्ज माफी सरसकट करण्यात यावी अजूनही शेतकऱ्यांना कर्ज माफीचा काही फायदा मिळालेला नाही.

प्रकाश मेहता यांनी केलेला भ्रष्टाचार समोर आल्यावर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.  त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.  याबाबत विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत.

पीक विमा बाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

गेली चार वर्षे सरकारने ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी कितपत झाली हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आगे फक्त सरकार फक्त घोषणा करत असून त्याचा जनतेला काहीच फायदा होत आहे.

राज्यसरकार आपलं अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार केलं आहे मंत्रिपदाच अमिश दाखवत विरोधीपक्षातील नेत्यांना फोडण्याच काम केलं आहे.

राज्यसमोर अनेक समस्या आहे. याचा जाब विचारला जाणार. या अधिवेशनात सर्व मुद्यावर आवाज उठवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *