देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

सोमैया मैदानावर महाराष्ट्र दिन सन्मान सोहळा सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही’ महाराष्ट्र म्हणजे अठरा पगड जातींचा प्रदेश, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
मुंबईत भाजपाची बुस्टर सभा झाली. दरम्यान बाबरी पडण्याचा दावा पोकळ असून बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचे कुणीही हजर नव्हते, असा वक्तव्य त्यांनी केलं. बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचे कुणीही हजर नव्हते. बाबरी पाडण्याच्या आरोपात सेनेचे नेते नाहीएत. बाबरी पडताना मी तिथे होतो, तुम्ही नव्हतात, असं त्यांनी सागितलं.
‘मुख्यमंत्री महाराष्ट्र दिनी सुद्धा टोमणेच मारतात’ अशी टीका फडणवीसांनी केली.
‘हनुमान चालीसा म्हटल्याने रावणाचे राज्य उलथवले जाईल ना ?’ असा सवाल देखिल फडणवीस यांनी शिवसेनेला केला. ‘कलम ३७० हटवण्याची हिम्मत नरेंद्र मोदी यांनी दाखवली’ याची आठवण देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली.
‘इंधनावर कर कमी करायला अडचण काय?’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. जीएसटीची राज्याला कसलीही थकबाकी नाही. ‘मविआचे मंत्री तुरुंगातून काम करतात का?’ ‘मुख्यमंत्र्याचे वर्क फ्रॉम होम आणि मालिकांचे वर्क फ्रॉम जेल’, आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. जमलंच तर तुटून पाडा ना भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर, फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
‘मुंबई मराठी माणसाला मिळवून द्यायची आहे. ‘मुंबईला तोडण्याची कोणाच्या बापाची हिंमत नाही’ असं फडणवीस म्हणाले.