व्यसनमुक्तीसाठी नेणाऱ्या काकावर जीवघेणा हल्ला

व्यसनांमुळे घडणारे गुन्हे हा चिंतेचा विषय ठरतोय. पिंपरीमध्ये व्यसनाधीन मुलाकडून असाच गुन्हा घडला आणि संतापाच्या भरात भाच्याने मावशीच्या पतीवर प्राणांतीक हल्ला केला.

काय आहे नेमका प्रकार?

पिंपरीतील कासारवाडी येथे राहणाऱ्या दीपा आणि परम शर्मा या पतीपत्नींसोबत दीपा यांचा भाचा लालबहादूर भोंटे देखील राहत होता.

लालबहादूर व्यसनाच्या आधीन होऊ लागल्यामुळे दीप आणि परम दोघेही चिंतीत होते.

त्यांनी अनेकदा त्याला समजवायचा प्रयत्न केला.

अनेक उपायांनी त्याचं व्यसन सुटावं म्हणून उपचार केले.

पिंपरीतील YCM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला.

यावरून भाचा लालबहादूर भोंटे याने रागात परम शर्मावर चाकूने वार केला.

याबाबत दीपा परम शर्माने पोलिसात तक्रार केली आहे.

याबाबत पोलिसांनी आरोपीला अटक करत गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version