Sun. May 16th, 2021

व्यायाम बंद केल्यास होऊ शकतात ‘हे’ परिणाम!

व्यायामाची गरज ही आजच्या काळात प्रत्येकालाच असते. पण गरजेपेक्षाही जास्त अनेकदा तरुण आवड म्हणून किंवा एखाद्या Bollywood अभिनेत्याचं physique पाहून Gym जॉईन करतात. 31 डिसेंबरला नववर्षाचा संकल्प म्हणून बरेचजण Gym ला जायला सुरुवात करतात. प्रोटिन्स शेक घेऊ लागतात. डाएट फॉलो करू लागतात. मात्र बऱ्याचदा व्यायामाचा उत्साह काही दिवसांतच मंदावतो. कधी पटकन effect न जाणवल्याने तर काहीवेळा झेपेनासं झाल्यामुळे किंवा काहीवेळा व्यायामासाठी पुरेसा वेळ देणं शक्य नसल्यामुळे लोक काही दिवसांतच Gym सोडून देतात. व्यायामात खंड पडतो. पण अशा प्रकारे व्यायामाला सुट्टी देण्याचे शरीरावर उलटे दुष्परिणाम घडून येतात, याची तुम्हाला कल्पना आहे का?

व्यायाम करणं बंद केलं, तर?

 • नियमित व्यायाम करणाऱ्यांनी अचानक व्यायाम करणं बंद केलं, की आठवड्याभरातच शरीरामध्ये बदल घडू लागतात.
 • मसल्स (स्नायू) अखडायला लागतात.
 • बॉडी ढिली पडू लागते.
 • शरीराची Maximum Oxygen Consumption ची पातळी कमी होऊन जाते.
 • कारण रोज व्यायाम करणाऱ्यांसाठी work out करताना जास्त ऑक्सिजनची गरज भासत असते.
 • व्यायाम थांबवला की त्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे ऊर्जा कमी होते.
 • उत्साह कमी होऊन थकवा जास्त येऊ लागतो.
 • एकूणच स्टॅमिना कमी होऊन जातो.
 • याचा परिणाम असा होतो, की जर ठराविक अंतर पार करायला तुम्हाला कमी वेळ लागत असेल, तर तेवढंच अंतर पार करायला जास्त वेळ लागतो. त्यात थकायलाही होतं.
 • शरीर सुस्त पडू लागतं.
 • पचनक्रिया बिघडू लागते. खाल्लेलं पचेनासं होतं. आतड्या नाजूक होतात.
 • या सगळ्याचा परिणाम होऊन वजन वाढू लागतं.
 • शरीर थुलथुलीत बनू लागतं. पोट सुटू लागतं.
 • झोपेवरही या गोष्टीचा परिणाम होऊ लगतो.

एकूणच व्यायाम सोडल्यावर शरीर पहिल्यासारखं राहत नाही किंवा आरोग्यही आधीसारखं ठणठणीत राहत नाही. या सर्वांचा विचार करूनच Gym लावा. रोज 2 तास किंवा 3 तास व्यायाम करणं शक्य होत नसेल, तर कमीत कमी 30 ते 40 मिनिटं तरी work-out कराच. Work out करणं थांबवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *