Wed. Oct 5th, 2022

शत्रुघ्न सिन्हांच्या भाजप सोडण्यावर सोनाक्षी सिन्हाची ‘ही’ प्रतिक्रिया!

भाजपचे खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ‘वडिलांनी हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता’ अशी प्रतिक्रिया सोनाक्षी सिन्हाने दिली.

 

‘BJP मध्ये ज्येष्ठ नेत्यांना मान नाही

सोनाक्षी सिन्हाने शत्रुघ्न सिन्हांच्या BJP मधून बाहेर पडण्याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं, की हा पूर्णपणे माझ्या वडिलांचा निर्णय होता.

जिथे तुम्हाला आनंद मिळत नाही, तिथे थांबू नये.

माझ्या वडिलांनी हाच विचार करून निर्णय घेतला.

खरंतर हा निर्णय त्यांनी खूप आधीच घ्यायला हवा होता.

मला आशा आहे, की आता काँग्रेसमध्ये काम करताना त्यांची कुचंबणा होणार नाही.

 

‘वाजपेयी अडवाणींची BJP आता राहिली नाही’

प्रतिक्रिया देताना सोनाक्षीने हे देखील म्हटलं की माझे वडील सुरूवातीपासून BJP सोबत होते.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जे.पी. नारायण यांच्या काळात माझ्या वडिलांना मान मिळत होता.

मात्र आता पक्ष त्यांना मानाने वागवत नाही.

त्यामुळे ते आता भाजपमधून बाहेर पडले आहेत.

त्यांनी हा निर्णय घ्यायला खूप उशीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.