Tue. Jun 28th, 2022

‘शरद पवारांना ब्राम्हण समाजाची आठवण’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी ब्राह्मण समाजाच्या संघटनांची बैठक बोलावली आहे. २० ते २२ संघटनांना शरद पवारंनी आमंत्रण दिले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की इतक्या वर्षांनी शरद पवारांना ब्राह्मण समाजाची आठवण आली ही आनंदाची बातमी आहे. असा टोला लगावला आहे. कोणत्याही समाजाला बैठका बोलावण्याता अधिकार आहे असही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शरद पवार  यांचा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. यासाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर अनेक ब्राम्हण संघटनांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. २० ते २२ संघटना चर्चेसाठी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी राज्यातील वातावरण निवळण्याचा बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत आहे. सामाजातील राष्ट्रवादीची विरोधी रोष कमी करण्यासाठी ही बैठक बोलवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी या बैठकीचे निमंत्रण नाकारले असून, बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राह्मण महासंघाचा कुठलाही पदाधिकारी या बैठकीत जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी स्पष्ट केले आहे. तर अन्य संघटना या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

बैठकीत कोणते संघ उपस्थित

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, रामभाऊ तडवळकर
जागतिक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष अजित घाटपांडे, सचिव अभिजीत आपटे
यांच्यासह जवळपास २०हून अधिक संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला हजर असल्याचे समजतेय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.