Sun. Jun 20th, 2021

शरद पवार यांच्या आवाहनानंतर पूरग्रस्तांसाठी अवघ्या अर्ध्या तासात 1 कोटींचा निधी

पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केलं आणि त्याला बारामतीकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या अर्ध्या तासात 1 कोटी रुपयांची मदत जमा झाली.

‘रयत भवन’मध्ये शरद पवार यांनी बारामती शहरातील व्यापाऱ्यांची तातडीने बैठक घेतली.

पूरग्रस्तांच्या मदतनीधीसाठी त्यांनी व्यापाऱ्यांना मदतीचं आवाहन केलं.

या आवाहानाला प्रतिसाद देत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रतिष्ठानकडून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली.

याशिवाय माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी पाच लाखांची मदत दिली.

बारामतीतल्या व्यापाऱ्यांनीन लाखो रुपयांसह धान्य, कपडे आणि भांड्यांचीही मदत देऊ केली आहे. याशिवाय सहकारी साखर कारखान्यांनी 400 पोती साखर देण्याचंही जाहीर केलंय. पवार यांच्या आवाहनाला बारामतीकरांनी जोरदार प्रतिसाद देऊन 1 कोटी रुपयांचा निधी जमा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *