Wed. Jun 19th, 2019

शरद पवार यांना पहिल्या रांगेतीलच पास, ऱाष्ट्रपती भवनाचा खुलासा

0Shares

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीवर मात करत केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसऱ्यांदा शपथविधी पार पडला. या शपथविधीला काहूींनी पाठ फिरवली. यावेळी शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान दिल्याने मोदींनी त्यांचा अपमान केल्याची सर्वत्र चर्चा होती. यावर राष्ट्रपती भवनाने स्पष्टीकरण दिले आहे. पवारांना पहिल्या रांगेचा पास दिला असलेचा दावा राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकांमध्ये विजयानंतर मोदींचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

शपथविधीसाठी जेष्ठता डावलून पाचव्या रांगेचा पास दिला म्हणून शरद पवार नाराज झाले होते.

नाराजीमुळे पवार शपथविधी सोहळ्याला हजर नव्हते. मात्र गैरसमजातून हा प्रकार घडल्याचं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट कऱण्यात आलंय.

शरद पवारांना पवारांना व्हि सेक्शनचा पास देण्यात आला होता. व्हि सेक्शनचा पास पहिल्या रांगेचा पास म्हणजे व्हिव्हिआयपी रांगेचा पास असतो.

मात्र शरद पवारांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हा पास रोमन संख्येतील पाचव्या रांगेचा आहे असा गैरसमज करुन घेतला.

राष्ट्रपतीचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला.

राष्ट्रपती कार्यालयाच्या खुलास्यावर आतापर्यंत शरद पवार यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: