Jaimaharashtra news

शिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रत्येक पक्ष हा जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठीच लढतो. शिवसेना या निवडणुकीत 100 च्या वर जागा जिंकेल,’ असे वक्तव्य राउत यांनी केले.

भाजपला बहुमत मिळाल्यास काय? असं विचारण्यात आलं तेव्हा महायुतीला बहुमत मिळेल असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

‘शिवसेनेला 124 जागाही मिळू शकतात. पण शेवटी आम्ही युतीमध्ये लढलो आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना एकमेकांशिवाय पर्याय नाही,’ असंही ते म्हणाले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच!

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, असा विश्वासहि संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्राच्या विधानभवनात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार, असा शब्द उद्धव यांनी दिलाय. त्यांच्या नेतृत्वावर आणि डावपेचांवर आम्हा सर्व शिवसैनिकांचा विश्वास आहे. त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार,’ असं त्यांनी सांगितलं.

जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना 100 च्या वर जाईल का, याबद्दल आता उत्सुकता आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. राज्यातील 95,473 मतदान केंद्रांवर 1.8 लाख EVM च्या मदतीनं मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. महाराष्ट्राची नवी विधानसभा कशी असेल, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

Exit mobile version