Wed. Jun 26th, 2019

‘शुमुख’ जगातील सर्वात महागडा परफ्यूम

24Shares

मनुष्याला नेहमीच सुगंधाचं आकर्षण वाटत आले आहे. प्राचीन काळापासूनच फुलांपासून अत्तर व अन्य सुगंधी द्रव्ये बनवली जात आहेत. आता तर perfume industry खूपच विस्तारली आहे. अत्तरं, परफ्यूम्स, डिओडरण्ट्सचा वापर प्रत्येकजण करतोच करतो. यामध्ये पॅरिस आणि संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये बनणाऱ्या परफ्युमला सर्वांत जास्त मागणी असते आणि इथल्या परफ्युम्समध्ये प्रचंड विविधता असते. मात्र या परफ्युम्सच्या किमती त्यांच्या सुगंधानुसार महाग होत जातात.

मात्र UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमधील एका परफ्युमची चांगलीच चर्चा आहे. येथील एका कंपनीने तयार केलेला perfume हा जगातला सर्वात महागडा परफ्यूम असल्याचा दावा करण्यात येतोय.

या परफ्युमचं नाव आहे ‘शुमुख’!

अरबी भाषेत ‘शुमुख’चा अर्थ ‘सर्वात योग्य’ असा होतो.

हे शुमुख परफ्यूम ठेवण्यासाठी इटालियन मुरानो क्रिस्टलची एक विशेष बाटली तयार करण्यात आली आहे.

तिला सोन्यापासून बनवलेले गरूड, अरबी घोडे, गुलाब आणि पृथ्वीचा गोल यांच्या आकृतीने सजवण्यात आले आहे.

38.55 कॅरेटचे 3571 हिरे, 18 कॅरेट सोन्याचे अडीच किलो मणी आणि 5.9 किलो शुद्ध चांदीचाही यामध्ये वापर करण्यात आला आहे. या बाटलीनेच दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत!

असगर अदम अली यांनी हा परफ्यूम बनवला आहे.

तीन लिटर परफ्यूमची किंमत सुमारे 8.93 कोटी रुपये इतकी आहे.

हा परफ्यूम बनवण्यासाठी एक, दोन नव्हे तर तब्बल तीन वर्षांचा काळ लागला.

या काळात त्याच्या एकूण 494 वेळा चाचण्या घेण्यात आल्या.

गिनिज बुकनुसार पहिला सर्वात महागडा परफ्यूम ‘क्‍लाईव्ह ख्रिश्‍चियन नंबर 1 इम्पिरियल मॅजेस्टी’ हा आहे.

 

24Shares

Leave a Reply

%d bloggers like this: