Tue. Jul 27th, 2021

शेतकऱ्यांवर आली जनावरं विकण्याची वेळ

महाराष्ट्र भर पावसाने हाहाकार माजवत शेतकऱ्याचं होत्याच नव्हतं करून टाकलं. हाती आलेलं पीक शेतकऱ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी उध्वस्त होतांना पाहिलं त्यात जनावरांना चारा मिळत नाही चारा साठी आता वन वन भटकावे लागत आहे. चारापाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यात शेतकऱ्यांना खायला अन्न व्यवस्तीत मिळत नाही, तर जनावरांना कोठून खाऊ घालणार असा प्रश्न करत शेतकऱ्यांनी आपली जनावरे कवडी मोल भावात विक्रीला काढली आहे.

आज बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधनाची विक्री होतांनाच चित्र पहावल्यास मिळाल अतिशय भयावह परिस्तिथी झाली असून शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही शेतकरी आपली जनावरे विकून आता आपला उदरनिर्वाह करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सर्वात मोठया बाजारपेठ मधील वास्तव समोर आलं आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *