Fri. May 7th, 2021

शेतकऱ्यांसाठी खुषखबर, पुण्यातील कळमोडी धरण 100% भरलं!

पुणे जिल्ह्यातील कळमोडी धरण 100 % भरलंय. कळमोडी हे धरण आरळा या नदीवर आहे. आता ही नदी दुथडी भरून वाहतेय. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढलाय. त्यामुळे गुरुवारी कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरलं. या धरणात 1.51 टीएमसीपाणी साठा आहे. धरण भरल्यामुळे त्यावरून सुमारे 100 क्‍युसेस वेगाने पाणी खाली कोसळतंय. यामुळे आरळा नदीला पुराचं स्वरूप प्राप्त झालंय.

धरणातील पाणीसाठा आणि पावसाची आकडेवारी

एकूण पाणी पातळी 682.70 दशलक्ष घनमीटर

एकूण साठा 33.75 दशलक्ष घनमीटर

उपयुक्त पाणीसाठा 32.16 दशलक्ष घनमीटर

टक्केवारी 100 टक्के

धरणातील पाणी क्षमता 1.51 टीएमसी

कळमोडी (ता. खेड) : धरण गुरुवारी 100 टक्के भरले.

या नदीचे पाणी आता चास-कमान धरणात येत असून चास-कमान धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होतेय. चासकमान धरणात 30 % पाणीसाठा उपलब्ध झालाय. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शेतकरी वर्गात दिलासा मिळणार असल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *