Wed. Oct 5th, 2022

शाहरुख खानला कोरोनाची लागण

देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडला कोरोनाचा विळखा घातला आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. पार्टीत सहभागी असणाऱ्या अनेकांची धाकधूक वाढली आहे.

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या आदित्य रॉय कपूर, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. पण कतरिना कैफ आता कोरोनामुक्त झाली आहे. किंग खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी ‘पठाण’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती.

अनन्या पांडे, फराह खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, ह्रतिक रोशन, जुही चावला,विकी कौशल, सलमान खान, काजोल, राणी मुखर्जी, करीना कपूर,कियारा आडवाणी, जाह्नवी कपूर,शाहरुख खान आणि मलयाका आरोरा यांसारख्या अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. एका पाठोपाठ एका सेलिब्रिटींना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. बोललीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक नुकताच आपला ५० वा वाढदिवस साजरा केला आहे. मुंबईतल्या अंधेरी येथील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये त्याने जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. बर्थडे पार्टीत ५० ते ५५ सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.