Fri. Aug 12th, 2022

संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी

काँग्रेसच्या दहाव्या यादीत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून  उचलबांगडी करण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांची निरूपम यांच्या जागी आता काँग्रेस मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

उमेदवारी मिळाली, पण पद गमावलं!

संजय निरूपम यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली आहे.

2014 साली निरूपम सुमारे साडे 4 लाख मतांनी पराभूत झाले होते.

भाजपच्या गोपाळी शेट्टींनी निरूपम यांचा त्यावेळी पराभव केला होता.

यावेळी मात्र निरूपम दिवंगत गुरुदास कामत यांच्या मतदारसंघातून उभे राहत आहेत.

निरुपम यांची लढत शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्याशी होणार आहे.

संजय निरूपम यांच्याविषयी अनेक तक्रारी यापूर्वी काँग्रेस हायकमांडकडे करण्यात आल्या होत्या.

मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

निवडणुकीपूर्वी मात्र त्यांना उमेदवारी तर मिळाली, पण पद सोडावं लागलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.