Tue. Aug 9th, 2022

संजय राऊत यांना ईडीचे बोलावणे

संजय राऊत यांना ईडीने समन्स धाडल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मात्र, संजय राऊत यांनी आपल्याला अद्याप ईडीची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. तशी नोटीस आली तरी आपण चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागू, अशी प्रतिक्रिया रविवारी संजय राऊत यांनी दिली आहे.

आज संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली, मला आताचा समजले ईडीनेमला समन्स पाठवले आहे. छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या मला अटक करा!
जय महाराष्ट्र

ई़डीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.