Fri. Jan 21st, 2022

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मधून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मधून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. पहाटेच्या सुमारास पारंपारिक पूजा विधि झाल्यानंतर टाळ मृदुंगांच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली.

पहाटे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात पूजा विधी झाल्यानंतर, पालखी सजवण्यात आली होती. सनई चौघडे आणि टाळ-मृदुंगाचा गजर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी, त्यांच्या हातात असलेले भगवे ध्वज, मुखी विठू नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली.

निवृत्तीनाथ महाराज पालखीला विशेष महत्व

सर्वात लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश होतो. त्यामुळे या पालखीला विशेष महत्त्व आहे.

तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू म्हणून देखील निवृत्तीनाथ महाराज यांची वारकरी संप्रदाय मध्ये एक वेगळे स्थान असल्याने या वारीत सहभाग घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून वारकरी येत असतात.

दुसरीकडे यंदाच्या वर्षी ही वारी निर्मल वारी म्हणून यशस्वी करण्यासाठी वारकरी प्रयत्न करणार आहेत.

ज्या गावातून जाईल त्या गावात वृक्षारोपण करणार असल्याची माहिती वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील जवळपास 5 लाख रेनकोट वारकऱ्यांना वाटून यंदाच्या वारीमध्ये आपली सेवा अर्पण केली आहे.

वारीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत.  आजचा मुक्काम नाशिकच्या सातपूर परिसरात असून त्यानंतर नगर मार्गे पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *