Sun. Jun 20th, 2021

सत्ता संघर्ष की अस्तित्वाची लढाई?

सत्ता संघर्ष की अस्तित्वाची लढाई हा खरा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांच्या समोर आला आहे, देशातील लोकशाहीचा महाकुंभ म्हणजे निवडणूक प्रक्रिया देशात शांततामय सुरू असताना शेवटच्या टप्प्यात याला गालबोट लागलंच. खरंतर अनेक राजकीय पंडित याला ‘सोची समजी साजीश’ म्हणत असले तरी हे नेमकं काय हे जाणून घेऊया.

सात टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुक प्रक्रियेत शेवटचा सातवा टप्पा अनेक दृष्टीने महत्वाचा होता, देशभरातील 29 राज्यात झालेल्या शांततापूर्ण मतदानानंतर सगळं सुरळीत होईल ही अपेक्षा असताना अचानक बंगाल मध्ये हिंसाचार सुरू झाला, भाजप आणि तृणमूल चे कार्यकर्ते हिंसक झाले,परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने वेळेआधीच प्रचारबंदी करावी लागली, यावरून स्थितीचा गांभीर्य लक्षात येईल.

बंगालमध्ये सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाच वातावरण असून येणाऱ्या दिवसात हा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे, बंगाल मध्ये भाजप विरुद्ध तृणमूल असा थेट मुकाबला होत असल्याने या संघर्षाची धार अधिक तीव्र झाली आहे, नरेंद्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री असताना ममता बॅनर्जी सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध जगजाहीर होते, याचा दाखला देखील मोदी यांनी एका मुलाखतीत दिला, ममता दीदी त्यांना आवर्जून न चुकता मिठाई आणि कुर्ता पाठवीत असल्याचं सांगितलं, अनेक वेळा दीदी प्रोटोकॉल तोडून मोदींच्या स्वागताला गेल्याच देखील जगाने पाहिलं आहे, अस असताना सुद्धा एकेकाळचे राजकीय मित्र आज इतक्या सत्ता संघर्षात का गेले, 2019 च्या निवडणुकीतील सर्वात हॉट सामना म्हणून या कडे पाहिलं जातंय.

मोदी सरकार तानाशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप अनेक वेळा विरोधी पक्षाने केला, सरकारी एजन्सीचा गैरवापर करत असल्याचं देखील बोलल गेलं, सीबीआयचा वापर सरकार करून विरोधीपक्ष आणि नेत्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतं, मग ते सरकार कोणत्याही पक्षाच असलं तरी असे प्रयत्न झाल्याचे अनेक दाखले आहेत, असाच प्रयत्न मोदी सरकार ममता दीदी च्या बाबतीत करत असल्याचा आरोप झाला आणि इथूनच या संघर्षाची ठिणगी उडाली

ममता दीदी मुख्यमंत्री असताना बंगाल मध्ये शारदा चिटफंड घोटाळा झाला? त्याची चौकशी सीबीआय मार्फत सुरू झाली चौकशी अंती ममता दीदी यात दोषी आढळल्या तर त्यांना जेल ची हवा खावी लागू शकते हे लक्षात येताच याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू झाला, काही वर्षे अगोदर ममता दीदींनी बनविलेली पेंटिंग त्याला मिळालेली किंमत, त्याची खरेदी विक्री करणारे यांचे धागे दोरे समोर येताच चिट फंड मध्ये ममता दीदी लिप्त असल्याची शक्यता बळावली, याला गांभीर्याने घेत मोदी सरकारने चौकशी सुरू केली.

ममता बनर्जींच्या आयुष्यात कलंक असलेला शारदा चिट फंड घोटाळा, याचा तपास करणारे IPS संजीव कुमार हे दीदी च्या मार्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जातात, तपासादरम्यान सीबीआय ने संजीव कुमार यांच्या कडे रोख केल्यानंतर दीदी त्यांच्या बचावला समोर आल्या, दीदी संजीव कुमार ला घेऊन उपोषणाला बसल्या आणि हा संघर्ष पेटला, प्रकरण कोर्टात गेलं कोर्टच्या आदेशानंतर संजीव कुमार याना सीबीआय समोर यावं लागलं आणि ममता दीदी बॅक फूट वर गेल्या.

ममता दीदी ज्या पद्धतीने भाजप ला आडव्या हाताने घेत समोर जात आहे यावरून हे तर स्पष्ट आहे की घोटाळ्यात दीदी दोषी आढळल्या तर पुन्हा मोदी सरकार सत्तेत आलं तर ममतादीदींचा फास आळविला जाईल आणि दीदीला जेलची हवा खावी लागेल, त्यामुळे इतर विरोधीपक्षांच्या तुलनेत भाजप विरोधात ममता बनर्जीची लढाई अधिक तीव्र आहे. त्यामुळे ही निवडणूक ममता बनर्जीच्या अस्तित्वाची निवडणूक आहे.

उत्तर प्रदेश मध्ये भाजपला नुकसान होणार असल्याचा अंदाज भाजप नेतृत्वाला आहे, त्यामुळे ती कमी बंगाल मधून भरून काढण्याचा प्रयत्न मोदी आणि शहा जोडी करत आहे, त्यामुळे बंगालमध्ये भाजप ने हिंदुत्वाचा कार्ड खेळला, योगी आदित्यनाथ यांच्या अनेक सभा बंगाल मध्ये घेण्यात आल्या, त्यामुळे बंगाल मधील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाल असून जातीधर्माच्या आधारतीत राजकारणाला खतपाणी घातलं गेलं, भाजप ने खेळलेली खेळी काही अर्थाने यशस्वी देखील होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे, 2014 च्या तुलनेत भाजप ला कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच पाठबळ वाढल्याचं दिसत आहे.

2019 ची निवडणूक भाजप साठीअतिशय महत्वाची असून यानंतर मोदींच्या नेतृत्वात भाजप निवडणुकीला समोर जाऊ शकणार नाही, मोदी 2024 मध्ये वयाच्या 70 जवळ असेल त्यामुळे भाजपकडे 2024 साठी नवा चेहरा शोधण्याबरोबरच पुढच्या पाच वर्षात त्याला प्रोजेक्ट करण्यासाठी आता सरकार येन आवश्यक आहे, संघ परिवार आणि भाजप मधील एक वर्ग योगी आदित्यनाथ यांना भाजपचा नवा चेहरा बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कट्टर हिंदुत्व ही मोदींची एक ओळख ठेवून 2014 मध्ये भाजप ला सत्ता मिळाली, त्यामुळे पुन्हा एकदा योगी च्या निमित्याने भाजप ला हिंदूत्व पुढे नेता येणार आहे, अस असलं तरी 2019 मध्ये मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले तर 2024 मध्ये त्यांच्या चेहरयावर निवडणुकीला समोर जाण्याची शक्यता राहील. मात्र आता पर्यंत मुख्यमंत्री पंतप्रधान राहिलेल्या मोदींना विरोधीपक्षात बसण्याचा, किंवा विरोधीपक्ष नेते पदाचा अनुभव नाही, त्यामुळे यंदा मोदी पंतप्रधान झाले नाही तर त्यांना संन्यास घ्यावा लागेल? तो राजकीय की सामाजिक हे 23 तारखेला स्पष्ट होईलच, त्यामुळे ही निवडणूक मोदींच्या अस्तित्वाची सुद्धा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *