Tue. Jun 28th, 2022

समुद्रकिनारी ‘या’ कालावधीत मासेमारी बंदी

रायगडच्या समुद्रकिनारी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी घोषित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत ६१ दिवस मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. अशी सुचना देण्यात प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या मासेमारी बंदचा कालावधी उरणचे मत्सव्यवसायक विकास अधिकारी, परवाना अधिकारी सुरेश बावुलगावे यांनी ही माहिती दिली आहे. ११ मे ला करंजे येथे आणि १८ मे ला मुलेखंड, मोरो येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. मोरो येथे नौका मालक, चालक आणि मच्छीमार या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत सुरेश बावलगावे यांनी सांगितले की या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण आणि बीजनिर्मिती सुरक्षेसाठी मच्छीमारी बंदी ठेवण्यात आला आहे. या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे मच्छीमारांची होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी मच्छीमारी बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. याकालावधीत मासेमारी बंदीमुळे बीजनिर्मितीस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम २०२१ च्या कलम १४ अन्वये दंडात्मक शिक्षा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. पारंपारिक पद्धतीने  मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही पावसाळी बंदी लागू होणार नाही.

1 thought on “समुद्रकिनारी ‘या’ कालावधीत मासेमारी बंदी

  1. This is the right blog for anyone who wants to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I actually would want…HaHa). You definitely put a new spin on a topic thats been written about for years. Great stuff, just great!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.