Sun. Oct 20th, 2019

साध्वी प्रज्ञा यांचं 21 तासांचं मौनव्रत!

भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून एकाहून एक वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मौनव्रत धारण कऱणार असल्याचं जाहीर केलंय. 21 तास साध्वी मैन पाळणार आहेत.

साध्वीचं मौनव्रत!

शहीद हेमंत करकरे यांचा आपण दिलेल्या शापामुळे मृत्यू झाल्याचं वक्तव्य असो, किंवा नथुराम गोडसे देशभक्त होते असं वक्तव्य असो, साध्वी प्रज्ञा यांनी उमेदवारी मिळाल्यापासून केलेल्या वक्तव्यांमुळे देशभरात गदारोळ झाला होता. भाजपनेही साध्वींना पाठिंबा दिला नव्हता. आपल्या वक्तव्यांबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली होती. तर पंतप्रधान मोदी यांनीही अखेर याबद्दल बोलताना साध्वींना आपण कधीच मनापासून माफ करणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.

मात्र आता निवडणुका झाल्यावर साध्वी यांनी चिंतन सुरू केलं असल्याचं म्हटलंय.

निवडणुकीदरम्यान जर माझ्या शब्दांनी देशभक्तांना दुःख झालं असेल तर मी माफी मागते, असंही त्यांनी म्हटलंय.

याचंच प्रायश्चित म्हणून आपण 21 तास मौन पाळणार आहोत, असं साध्वींनी जाहीर केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *