Wed. Aug 21st, 2019

‘साहो’ सिनेमा आता रिलिज होणार आता ‘या’ तारखेला!

0Shares

टॉलिवूडचा ‘रिबेल स्टार’ अशी ओळख असणारा प्रभास ‘बाहुबली’ सिनेमाच्या दोन्ही भागांमधून देशभरातल्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनाल. त्याची लोकप्रियता आभाळाला भिडली. 5 वर्षांत केवळ ‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोनच सिनेमांमध्ये काम करणाऱ्या प्रभासचा बाहुबलीनंतर ‘साहो’ हा सिनेमा येणार असल्यामुळे त्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

सुजित रेड्डी दिगदर्शित ‘साहो’ मध्ये प्रभाससोबत श्रध्दा कपूरही आहे.

हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. मात्र आता त्याचं प्रदर्शन लांबवणीवर पडलंय.

‘साहो’ आता 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

कारण 15 ऑगस्टला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आणि जॉन अब्राहम हयाचा ‘बाटला हाऊस’ हे चित्रपट लोकांच्या भेटीस येणार आहे.

या सिनेमांशी स्पर्धा टाळण्यासाठी ‘साहो’ च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलीय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *