Mon. Sep 27th, 2021

सिद्धार्थनंतर आता रणवीर सिंगसोबत आदिनाथ कोठारे, ‘या’ भूमिकेत चमकणार!

रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या सिनेमात रणवीर सिंगबरोबरच गाजला तो मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव. यापूर्वी रणवीर सिंगसोबत ‘बाीराव मस्तानी’ सिनेमात रणवीरसोबत मराठी स्टार वैभव तत्त्ववादी बॉलिवूडमध्ये चमकला होता. रणवीर सिंगच्या आगामी ’83’ या सिनेमातही एक मराठी अभिनेता बॉलिवूडमध्ये एण्ट्रीसाठी सज्ज झालाय. हा अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे.

1983 साली भारताने पहिल्यांदाच World Cup ला गवसणी घातली होती. याच ऐतिहासिक घटनेवर ‘83’ हा सिनेमा बनवण्यात येत आहे. या सिनेमात टीम इंडियाचा तत्कालीन कॅप्टन कपिल देवची भूमिका साकारतोय बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग. याच World Cup मध्ये टीम इंडियामधील महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या दिलीप वेंगसरकर यांची भूमिका आदिनाथ कोठारे साकरणार आहे.

एवढंच नव्हे, तर क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका त्यांचाच मुलगा चिराग पाटील साकारणार आहे.

’83’ सिनेमात अशी असेल बॉलिवूडची टीम इंडिया

भारतीय संघाने लंडनमध्ये 25 जून 1983 साली लॉर्ड्सच्या मैदानात World Cup जिंकला होता.

त्याच घटनेवर हा सिनेमा आधारित आहे.

यासाठी सिनेमामध्ये तगड्या कलाकारांची टीम तयार होतेय.

इतर खेळाडूंच्या भुमिकांसाठी नावांची निश्चित्ती अजून झाली नसली, तरी काही नावांवर शिक्कामोर्तब झालेले आहे.

त्यापैकी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेमध्ये आदिनाथ कोठारे पहायला मिळणार आहे.

तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांच्यासाठी दाक्षिणात्य अभिनेता जीवा याच्या नावाची निश्चिती झाली आहे.

साहिल खट्टर माजी Wicket Keeper सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तर संदीप पाटील यांच्या भूमिकेत त्यांचाच मुलगा चिराग पाटील दिसणार आहे.

तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे.

क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे.

 

या सिनेमाची तगडी फौज पाहून हा सिनेमा कसा रंगणार याची उत्सुकता वाढली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *