Tue. Jun 18th, 2019

स्वार्थासाठी माझ्या दिवंगत वडिलांचं नाव वापरू नका, उत्पल पर्रिकरांचं शरद पवार यांना पत्र!

917Shares

आपल्या राजकीय स्वार्थासाठी माझ्या दिवंगत वडिलांच्या नावाचा वापर करू नका, असं आवाहन गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसंच देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांना पत्राद्वारे केलं आहे. राफेल खरेदी प्रकरणावरूनच मनोहर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं शरद पवार प्रचारसभेत म्हणाले होते.

तुमच्यासारख्या ज्य़ेष्ठ नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती

उत्पल पर्रिकर यांनी शरद पवारांना पत्र लिहिलं आहे.

माझ्या वडिलांसंदर्भात चुकीचं विधान केल्याचा आरोप त्यात शरद पवार यांच्यावर करण्यात आला आहे.

राफेल खरेदी प्रकरणामुळेच मनोहर पर्रिकर राजीनामा देऊन गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परतले, असा आरोप हा दिवंगत मनोहर पर्रिकर आणि गोव्याच्या जनतेचा अपमान आहे, असं या पत्रात म्हटलंय.

माझे वडील गंभीर आजाराशी लढत असतानाही अनेक राजकारण्यांनी त्यांचं नाव वापरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यावेळी त्यांनी त्या ही परिस्थितीत सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

मात्र आता ते हयात नसल्यामुळे त्यांचं नाव घेऊन तुम्ही खोटं बोलत आहात.

शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि आदरणीय राजकारण्यांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती, असं या पत्रात उत्पल यांनी म्हटलंय.

सेना मजबूत करण्यासाठीच माझ्या वडिलांनी घेतले निर्णय

माझ्या वडिलांनी राफेल खरेदीचा निर्णय हा भारतीय सेनेच्या हितासाठीच घेतला होता.

ते अत्यंत प्रामाणिक व्यक्ती होते.

गोव्यात आणि दिल्लीतही त्यांनी जनतेसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले.

संरक्षणमंत्री असतानाही त्यांनी जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, त्यासाठी ते जनतेच्या कायम लक्षात राहतील.

कर्तव्याचं भान ठेवूनच माझे वडील दिल्लीहून पुन्हा गोव्याला परतले.

तुम्हीही एकेकाळी संरक्षणमंत्री होता, त्यामुळे शस्त्रसिद्ध असणं सेनेसाठी किती महत्त्वाचं असतं, याची आपल्याला जाणीव असेलच. तरीही माझ्या दिवंगत वडिलांच्या नावाचा वापर करून खोडसाळ अपप्रचारात आपण सहभागी झालात, याचा मला विषाद वाटतो, असं उत्पल पर्रिकर यांनी पत्रात लिहिलंय.

917Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *