Fri. Jun 21st, 2019

‘ही’ अट पूर्ण झाली, तर कतरिना करेल विवाह!

0Shares

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. सर्वत्र लग्नाची धामधूम पाहायला मिळते. सेलिब्रेटीही याला अपवाद नाही. दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर या अभिनेत्रींनी लग्न करून आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली. आता अभिनेत्री कतरिना कैफकडे सर्वांचे लक्ष आहे. कॅटलाही केव्हा लग्न करते असे प्रश्न अनेकदा विचारतात.

लग्न हा विषय येताच कतरिना शांत राहणेच पसंत करते.

पण मीडियाने तिला लग्न केव्हा करणार, असा प्रश्न केला. तेव्हा तिने पहिल्यांदाच असे काही उत्तर दिले की, ते ऐकून सर्वच स्तब्ध झाले. लग्नासाठी कुणीतरी थांबावं अशी तिची इच्छा आहे.

कॅट आता 35 वर्षांची झाली.

बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा तिचे सलमानसोबत अफेअर होते.

त्यानंतर ती रणबीरच्या प्रेमात पडली.

काही दिवसानंतर या दोघांचेही नाते संपुष्टात आले.

 

आता रणबीर आणि आलियाच्या प्रेमाच्या गोष्टींना बहर येत आहे.

त्यामुळे कॅटला मीडियाला सामोरे जावे लागते.

मीडियाने कतरिनाला लग्नाविषयी विचारले, तर पहिल्यांदाच तिने शांत न राहता उत्तर दिले.

ती म्हटली की, “लग्न तर मला करायचेच आहे योग्य वेळ येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करेन.पण माझ्या बरोबर लग्न करण्यासाठी कुणीतरी थांबावे अशी माझी इच्छा आहे.”

कॅटने कॉमेडी अंदाजात उत्तर देऊन सर्वांना आकर्षित केले.

अशा प्रकारे नेहमी मीडियाच्या प्रश्नांना हलक्या फुलक्या अंदाजात उत्तर देऊन कॅट वेळ मारून नेते.

 

 

 

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: