हुंडा घेणार नाही आणि हुंडा घेऊही देणार नाही; लाल महालात संभाजी ब्रिगेडनं घेतली शपथ
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
एकीकडे राजकीय नेते शितलच्या मृत्यूनंतर नेहमीप्रमाणेच राजकारण करताना दिसत आहेत.
पण, दुसरीकडे संभाजी ब्रिगेडनं मात्र एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. शितलला आत्महत्या करायला लागण्यामागे मुख्य कारण होतं ते हुंड्यामुळे तीचं लग्न न होणं. यामुळेच आता यापुढे हुंडा घेणार नाही आणि हुंडा घेऊही देणार नाही अशी
शपथ संभाजी ब्रिगेडनं घेतली.
लाल महालमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने या अनोख्या श्रद्धांजलीचं आयोजन करण्यात आलं होते. शितलच्या आत्महत्येनंतर हुंडाविरोधी अभियानाला सुरुवात करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुलांना उद्धवस्त
करणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे अशी शपथही यावेळी घेण्यात आली.