Wed. Oct 27th, 2021

हुबळी रेल्वेस्थानकावर पार्सलमध्ये स्फोट, ‘या’ आमदाराच्या नावे पार्सल

या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस सतर्क झाले असून रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, बसस्थानके या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कर्नाटकमधील हुबळी या रेल्वेस्टेशनवर झालेल्या स्फोटाचे कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हुबळी रल्वेस्टेशनवर सोमवारी ज्या पार्सलचा स्फोट झाला. ते पार्सल तामिळनाडूमधून कोल्हापूरला येत होते. ज्या रेल्वेमधून पार्सल येत होते, ती रेल्वे अमरावती एक्स्प्रेस हुबळीपर्यंत होती.

आरपीए जवानाला डब्यातील बॉक्स संशयास्पद वाटल्याने तो उतरुन विक्रेत्याकरवी खोलण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे उजळाईवाडीत शुक्रवारी झालेल्या स्फोटाशी कनेक्शन असल्याचे वर्तवले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात “हायअर्लट” जारी

या स्फोटाचा उजळाईवाडीत झालेल्या स्फोटाशी काही कनेक्शन आहे का? याची चौकशी कोल्हापूर पोलीस करणार आहे.

स्फोट झालेल्या पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकरांचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोल्हापुरातील स्फोटानंतर हुबळीत झालेल्या स्फोटाने सीमाभागातील पोलीस यंत्रणा अलर्ट

त्यासाठी स्थानिक दहशतादी विरोधी पथक आणि बॉम्बशोध पथकाच्या तज्ञांनी टीम सोमवारी रात्री हुबळीकडे रवाना झाली आहे.

दरम्यान कोल्हापूरमध्ये घातपात घडवण्यासाठी किंवा अन्य काही कारणासाठी स्फोटके आणण्यात येत होती, या अनुषंगाने तपास सुरु आहे.

या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस सतर्क झाले असून रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, बसस्थानके या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *