अरुणाचल प्रदेशमध्ये एका आमदारासह सात जणांची हत्या

लोकसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता लागली असून दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आमदारासहीत ७ सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं ?

लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान झाले असून 23 मे ला मतमोजणी होणार आहे.

देशभरात सध्या लोकसभेच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.

अरूणाचल प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.

एका आमदारासहीत ७ सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

नागा दहशतवाद्यांच्या ‘नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड’ (एनएससीएन) या फुटीरतावादी गटानं ही हत्या केल्याचं सांगितलं जातं आहे.

एनएनपी पक्षाचे आमदार तिरोंग अबो यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सहा जणांचा देखील हत्या करण्यात आली आहे.

तिरोंग अबो हे अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम मतदारसंघाचे आमदार होते.

या घटनेने अरुणाचल प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version