Mon. May 17th, 2021

चीनमधील ‘ती’ मराठी तरुणी लवकरच महाराष्ट्रात परतणार

चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा उद्रेक चीनमधील वुहान प्रांतात झाला. याच वुहानमध्ये महाराष्ट्रातील एक तरुणी अडकली आहे. या अडकलेल्या तरुणीशी आरोग्य राज्यमंत्र्यांनी फोनद्वारे संवाद साधला आहे.

वुहान येथे अडकलेल्या तरुणीचे अश्विनी पाटील असे नाव आहे. ही तरुणी महाराष्ट्रातील साताऱ्यातील आहे. या तरुणीशी आरोग्य राज्यंमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी फोनद्वारे संपर्क साधला आहे.

याबाबतची माहिती ट्विटद्वारे देण्यात आली आहे.

यावेळी राज्यमंत्र्यांनी संभाषणाद्वारे तरुणीला लवकरात लवकर मायदेशात आणले जाईल, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मायदेशात आणण्यासाठी सर्व अथक प्रयत्न करणार असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले.

आश्विनीला सुखरुप मायदेशी पाठवण्यासाठी चीनमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधला आहे. तसेच आश्विनीला सहकार्य करण्याची विनंतीही राज्यमंत्र्यांनी केली आहे.

या तरुणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मायदेशात परतण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर आरोग्य राज्यमंत्र्यांनी याची दखल घेतली.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील 26 विद्यार्थी भारतात परतले असून त्यांना आणण्यासाठी राज्यमंत्री श्री. पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

हे २५  विद्यार्थी सध्या निरिक्षणाखाली आहेत. यांना लवकरच सोडण्यात येणार आहे. या २५ विद्यार्थ्यांना सुखरुप घरी सोडण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कार्यवाही केली जाईल, असेही राज्यमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *