Sat. Jul 31st, 2021

दहा रुपयांच्या नाण्यांचा उमेदवाराला फटका

विधानसभा निवडणुका काही दिवसांवर ठेपली असून सर्व राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. लातूरमध्ये लातूर शहर मतदारसंघातून अपक्षाच्या जागेवरून संतोष साबदे हा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने लोकांकडून एक मत, दहा रुपये असा प्रचार करत 10 दिवसात दहा हजार रुपये जमा केले आहे.

नेमकं काय घडलं ?

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी एका अपक्ष उमेदवाराने लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला आहे.
लातुरच्या नागरिकांकडून एक वोट, दहा रुपये असा प्रचार करत दहा दिवसात दहा हजार रुपये जमा केले आहेत.
अर्ज भरताना दहा हजारांची नाणी स्वीकारणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले.
9 हजरांपर्यंत रोकड आणि हजाराची नाणी स्वीकारणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
त्यामुळे उमेदवारांसमोर मोठे आव्हान उपस्थित झाले.
मात्र उमेदवार बराच वेळापासून अर्ज भरण्याच्या कार्यलयाबाहेर उभा राहील्यामुळे निवडणूक आयोगाने मंजूरी देत अर्ज दाखल करून घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *