Wed. Aug 21st, 2019

देशात 100 पेक्षा जास्त पूल धोकादायक स्थितीत

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशात 100 पेक्षा जास्त पूल धोकादायक स्थितीत आहेत. पण यात राज्यातल्याही 14 पुलांचा समावेश आहे.

 

राष्ट्रीय महामार्गावर असणारे हे पूल कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्रालयानं ही यादी जाहीर केली.

 

यामध्ये पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरील पुलांचा समावेश आहे.

 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावित्री नदीवरच्या पुलाला झालेल्या अपघातानं धोकादायक पुलांचं वास्तव समोर आलं.

 

सावित्री पुलावरच्या दुर्घटनेत 42 जण मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे या धोकादायक पुलांची लवकरात लवकर दुरुस्ती किंवा ते नवीन बांधावेत अशी मागणी होत आहे.

राज्यातले कधीही कोसळतील असे 14 पूल-

 

पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातले पूल

सांगलीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 10 वर चार पूल धोकादायक

सांगलीच्या पेठ, भोसे, लांडगेवाडी, मिरज गावातल्या पुलांचा समावेश

सोलापूरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 वरील तीन पूल

सोलापूरच्या बोरामणी, कळसेनगर शेजारचा, भीमा नदीवरच्या पुलाचा समावेश

पुण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 वरील दोन पूल

पुण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर मुळा नदीवरचा, वारवे खूर्दचा पूल धोकादायक

नांदेडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 26 वर दोन पूल

नांदेडच्या पांगरी तसंच आसना नदीवरचे दोन पूल धोकादायक

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *