नाशकात १०० कोटींचा जीएसटी घोटाळा

नाशिकमध्ये १०० कोटींचा जीएसटी घोटाळा झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा घोटाळा केंद्रीय आणि राज्य जीएसटीच्या नाशिक आयुक्तालयाकडून उघड झाला आहे.
कामगारांच्या नावे बनावट कंपन्या दाखवत घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच बनावट कागदपत्रांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक झाली आहे.
नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्यांचा १०० कोटींचा जीएसटी घोटाळा झाला आहे. भंगार व्यापाऱ्यांनी कामगाऱ्यांच्या नावे बनावट कंपन्या स्थापन करत घोटाळा केल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्रांद्वारे भंगार आणि स्टील व्यापाऱ्यांकडून २० कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत शासनाची फसवणूक केल्याची माहिती समोर आली.
केंद्रीय आणि राज्य जीएसटीच्या नाशिक आयुक्ताकडून हा घोटाळा उघडकीस झाला आहे. दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी संशयितांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, या संशयितांनी न्यायालयात धाव घेतली. तर, सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे.