Mon. Jul 22nd, 2019

1000, 500 रुपयांच्या जुन्या नोटा मोजल्या नाहीत!- गव्हर्नर उर्जित पटेल यांची माहिती

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा अद्याप मोजल्या नसल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी दिली.

 

संसदेच्या अर्थ विषयक स्थायी समितीसमोर ऊर्जित पटेल यांनी ही नोटाबंदीबाबत महिती दिली. 30 डिसेंबरपर्यंत 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली होती.

 

या काळात किती जुन्या नोटा जमा झाल्या? असा प्रश्न स्थायी समितीचे सदस्य असलेले समाजवादी पक्षाचे नेते नरेश अगरवाल आणि तृणमूल काँग्रेसचे सुगातो रॉय यांनी ऊर्जित पटेल यांना केला.

 

जमा झालेल्या नोटा अद्याप मोजल्याच नसल्याचं यावेळी पटेल यांनी सांगितलं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीच्या काळात १७७ लाख कोटी रुपये देशाच्या चलनात होते.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: