Thu. May 13th, 2021

101 वर्षीय आजीने घातले सूर्यनमस्कार

राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त कल्याणमध्ये सामूहिक सूर्यनमस्काराचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात कल्याणमधील शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कल्याण डोंबिवली महापालिका आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्या वतीनं कल्याणच्या सुभाष मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी १० हजार ६२२ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १२ याप्रमाणे तब्बल १ लाख २७ हजार ४६४ सूर्यनमस्कार घातले.

या कार्यक्रमाचं आकर्षण ठरल्या त्या १०१ वर्षांच्या लक्ष्मीबाई दामले या आजीबाई. खास रत्नागिरीहून आलेल्या या आजीबाईंनी शालेय विद्यार्थ्यांच्या जोडीने त्याच उत्साहात सूर्यनमस्कार घातले.

अजूनही आपण दररोज ८० सूर्यनमस्कार घालत असल्यानेच या वयातही फिट असल्याचं लक्ष्मीबाईंनी सांगितलं.

या सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाचं ड्रोनच्या माध्यमातूनही विलोभनीय चित्रीकरण करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *