Thu. Jun 17th, 2021

आकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ

 कॉट्सवोल्ड्स 15 मे : यूकेमधील कॉट्सवोल्ड्सच्या (Cotswolds) ग्रामीण भागात उल्कापिंडचे दोन छोटे तुकडे हे अवकाशातून पृथ्वी कोसळले. उल्कापिंडचे दोन छोटे तुकडे हे ग्रामीण भागात मेंढ्या चरण्याऱ्या व्यक्तीला फेब्रुवारी (February) महिन्यात सापडले होते. मेंढ्या चारत असताना अचानक या मेंढपाळाला उल्कापिंडचे दोन छोटे तुकडे दिसले. या दोन उल्कापिंडच्या छोटे तुकड्यांची किंमत एक कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून, मेंढपाळानं हे एका म्यूझियमला (Museum) दान केले आहे. तसेच हे उल्कापिंड तब्बल 4 बिलियन (4 Billion Years) वर्षांपूर्वीचे आहेत. शिवाय या दगडाच्या मदतीनं स्पेसमध्ये जीवन असल्याच्या शक्यतेचं रहस्य उलगडू शकतं. हे दगड पाहिल्यानंतर असं वाटत होतं, की हा एक साधारण दगड आहे. मात्र, प्रत्यक्षात हा अत्यंत किंमतीचे आहे. दगडाचे हे तुकडे गेल्या चार बिलियन वर्षांपासून अंतराळातच तरंगत होते. शिवाय यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ते पृथ्वीवर पडले होते. हे मेंढपाळाला एका मैदानात आढळले. त्यानंतर या मेंढपाळऱ्या ते दान केले. आता सतरा मेपासून हे दगड म्यूझियममध्ये डिस्प्लेवर ठेवले जातील.

या स्पेस रॉकचं नाव ‘Winchcombe meteorite’ असं ठेवण्यात आलं आहे. हा उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ आहे. हे कार्बनेशियस कोंड्राईटचा एक प्रकार असल्याचं म्हटलं जातं. असं म्हटलं जात आहे, की मागील ३० वर्षात यूकेमध्ये आढळलेला हा पहिला दगड आहे. आकाशातून नारंगी आणि हिरव्या रंगाच्या आगीप्रमाणे कोसळलेलं हे उल्कापिंड सिक्यूरिटी कॅमेऱ्यात कैद झालं होतं. याआधी हा दगड कधीही जमिनीवर दिसला नव्हता. प्राथमिक माहितीनुसार, हा दगड यंदा फेब्रुवारी महिन्यात यूकेमधील एका गावात कोसळला होता .मेंढपाळाला यावेळी काहीतरी पडल्याचा मोठा आवाज ऐकू आला. जेव्हा तो मैदानात पोहोचला तेव्हा त्याला तिथे 103 किलोचा एक दगड आढळला. या मेंढपाळाचं नाव विक्टोरिया बांड असं असून ते 57 वर्षांचे आहेत. त्यांनी सांगितलं, की हा दगड पडल्यानंतर जवळपास पाच ते सात वैज्ञानिक त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी मेंढपाळाला याच्या बदल्यात एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिली. मात्र, जेव्हा मेंढपाळाला माहिती झालं, की हा दगड उल्कापिंड स्पेसबद्दल महत्त्वाची माहिती देणारा आहे, तेव्हा त्यांनी तो दान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *