Sat. Oct 1st, 2022

बीडमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून बलात्कार

दहावीच्या इयत्तेमध्ये शिकत असलेल्या एका मुलींवर बलात्कार झाला आहे. दहावीच्या कोंचिग क्लास मधून घरी जात असाताना तिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

दहावीच्या इयत्तेमध्ये शिकत असलेल्या एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना बीड मध्ये घडली आहे.  दहावीच्या कोंचिग क्लास मधून घरी जात असताना तिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे बीड जिल्हा हादरला आहे. या मुलीस चांगले शिक्षण घेऊन कलेक्टर व्हायचे होते. पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमके काय घडलं?

मागील वर्षभरापासून आरोपी या मुलीचा पाठलाग करत होता आणि तिची छेड काढत होता. ती कोचिंग क्लास वरुन घरी जात असताना , चार आरोपीनी तिचे अपहरण केले .

तिला नेकनूर परिसरातील एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यानंतर तिच्यावर तिथेच अत्याचार करण्यात आले. या संदर्भात आरोपीच्या वडिलांना सर्व गोष्टी माहित होत्या तरी त्यांनी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले नाही. त्याऐवजी त्यांनी मुलीलाच एका शेडखाली कोंडून ठेवले.

हे प्रकरण पोलिसांनी  दाबण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या कुटूंबीयाना तक्रार नोंदवित असताना त्यांना असे सांगण्यात आले की, तक्रार केल्यास मुलींची बदनामी होईल. पंरतु मुलीच्या कुटुंबीयांनी पाठ न फिरवता थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर आरोपीवर तक्रार नोंदवली गेली.

तक्रार नोंदवल्यानंतर मुलीला रुग्णालयात पाठवले गेले, पंरतु तिथे ही तिची टाळाटाळ करण्यात आली. पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे नागरिक संतापले आहे. या प्रकरणात पोलीस शिपाई गरजेला निलंबित करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.