Sun. Oct 17th, 2021

दहावीतील ‘रँचो’ची मोठी कामगिरी, इंजिनिअरिंगचं ज्ञान नसताना बनवली बाईक

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया

 

सध्याच्या वैज्ञानिक युगात रोजच नवनवीन शोध लागतात. इंजिनिअरिंग क्षेत्रात अनेक मुलं-मुली आपलं करिअर करून नवनवीन आविष्काराला जन्म देत आहेत.

 

 

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या एका रँचोनं भंगारातील एका बाईकला आधुनिक रुप दिलं. इंजिनिअरिंगचं कुठलंच प्रशिक्षण न घेता ‘हर्ष अग्रवाल’ या दहावीतील विद्यार्थ्यानं स्वतःच्याच कल्पनेतून हा अविष्कार साकारला.

 

यासाठी हर्षला त्याच्या शिक्षकांचं देखील महत्वाचं मार्गदर्शन लाभलं. तसेच त्याचं कुटूंबही त्याला प्रोत्साहन देत असून संपूर्ण बाईक बनवण्यासाठी फक्त 6 हजार रुपयांचा खर्च आला. पेट्रोलवर चालणारी ही बाईक सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *