Mon. Dec 16th, 2019

डोंबिवलीतील 11 जणांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुजरातमधील बरवाला येथे भीषण अपघातात महाराष्ट्रातील  11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे.

अपघातात मृत पावलेले सर्वजण डोंबिवलीतील रहिवासी आहेत. हे सर्व भाविक देवदर्शनासाठी गुजरातमध्ये गेले होते.

 

महाराष्ट्रातील डोंबिवलीत राहणारे हे सर्व भाविक जीपने गुजरातमधील भावनगर येथे पलिताना मंदिरात दर्शनासाठी जात होते.

अहमदाबादमधील धंधुका-बरवाला रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास जीप आणि ट्रकची धडक झाली.

या भीषण अपघातात 11 भाविकांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *