Mon. May 10th, 2021

पाक ध्वजांकित शर्ट घालणाऱ्या 11 तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा  

झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात 11 तरुणांचा पाकिस्तानी ध्वजांकित शर्ट घातलेला फोटो व्हायरल झाल्याने तणाव निर्माण झाला आहे.

हा फोटो मीडियावर दाखवल्यानंतर त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पाच तरुणांना अटक केली गेली आहे.

दि. १४ (फेब्रु) रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील आत्मघातकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यापासून भारत-पाक संबंधात तणाव निर्माण झाला आहे.

भारतप्रमाणे पाकिस्तानी सोशल  मीडियावर अनेक प्रकारे यावरती भाष्य केलं जात आहे.

झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात या 11 तरुणांच्या फोटोने मात्र तणावपूर्ण स्थीती निर्माण झाली आहे.

बैद्यपुरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज

पाकिस्तानमध्ये जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरावर भारतीय हवाई हल्ल्याचा आनंद निरसा ब्लॉकचे लोक साजरा करत होते.

निरसा ब्लॉकच्या लोकांनी सोशल मीडियावर काही स्थानिक तरुणांचे फोटो बघितले.

बैद्यपुर मध्ये पाक ध्वजांकित शर्ट घातलेल्या तरुणांच्या फोटोमुळे ताण निर्माण झाला.

लोकांनी मंगळवारी संध्याकाळी 11 तरुणांच्या घरी पोहचून तोडफोड केली.

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी बैद्यपुर गावात तेव्हा कलम 144 लागू केली.

पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.पोलीसांच्या म्हणण्याप्रमाणे स्थिती नियंत्रणात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *