अबब! गणपतीसाठी 1101 किलो वजनाचा भलामोठ्ठा लाडू!

नागपुरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तांची मोठी गर्दी आहे. टेकडीच्या गणपती बप्पाचे भक्तही जगभरात पसरले आहेत. या गणपतीच्या भक्तांच्या यादीत सचिन तेंडुलकर सारखी अनेक सुप्रसिद्ध नावं आहेत. यंदा या बाप्पाला एक खास नैवेद्य देण्यात आलाय. हा नैवेद्य म्हणजे विशालकाय लाडू आहे.
काय आहे या लाडवाचं वैशिष्ट्य?
बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास लाडू बनविण्यात आलाय.
या लाडवाचं वजन 1101 किलो आहे.
हा लाडू 4 फूट उंच आहे
या लाडवाचा व्यास 4 फूट आहे
हा लाडू बनवण्यासाठी हलवायाने खूप मेहनत घेतली आहे.
हा लाडू बनविण्यासाठी खास आग्रा आणि मथुरेहून 28 कारागीर आले होते.
त्यांनी 96 तासांत हा लाडू बनवला.
हा लाडू बनविण्यासाठी 280 किलो बेसन, 280 किलो तूप, 450 किलो साखर आणि 50 किलो ड्रायफ्रूट्स वापरण्यात आली.
या अजस्र लाडवाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवल्यानंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात येतो. बाप्पाचा प्रसाद भाविक मोठ्या श्रद्धेने ग्रहण करतात.