Wed. May 22nd, 2019

‘असा’ केला जैनसबींनी आपला 110 वा वाढदिवस साजरा!!

25Shares

वसईतील एव्हरशाईन येथे राहणार्‍या जैनसबी पठाण या आजींचा 110 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जैनसबी यांच्या मुलांनी 110 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलं. या कार्यक्रमाला उपस्थित महापौर रुपेश जाधव यांनी जैनसबी यांना दिर्घायुष्य लाभो, अशी देवाकडे प्रार्थना केली.

मखान आणि शेरखान पठाण याची आई जैनसबी यांना 110 वर्ष पूर्ण झाली.

आता त्यांनी 111 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

10 बाय 4 फुटांचा केक कापून जैनसबी यांनी आपला वाढदिवस साजरा केला.

हा केक त्यांनी मुलांमध्ये वाटला.

110 वर्षं पूर्ण केल्याचं औचित्य साधून 110 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणार आहेत.

खरंतर आजचं राहणीमान, कामाचा ताण आणि इतर अनेक गोष्टींमुळे माणसाचे आयुष्यमान कमी होऊ लागलं आहे.

मात्र या परिस्थितीचा सामना करत जैनसबी यांनी आयुष्याची 110 वर्षं पूर्ण केली आहेत.

या वयातही तरुणाला लाजवेल, अशी त्यांची दिनचर्या आहे.

आजही त्यांना चष्मा लागलेला नाही.

आवाज खणखणीत आहे

कानही तीक्ष्ण आहेत.

 

आईमुळेच सर्वकाही!

“आजही त्यांच्या सल्ल्याशिवाय आणि परवानगीशिवाय घरातील कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. आज आमच्या घरातील एकी, आनंद, समृद्धी याचे संपूर्ण श्रेय आमची आई जैनसबी यांनाच आहे,” असे त्यांची मुल शेरखान आणि मकखान यांनी सांगितलं.

जैनसबी यांना शुभेच्छा देण्यासाठी पठाण कुटुंबियांबरोबर त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होती. तसंच वसई विरार महानगर पालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी उपस्थिती दर्शवून 111 वर्षीय जैनसबी यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *