Sat. Feb 27th, 2021

वसई विरार महापालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसांठी एकूण 115 प्रभाग निश्चित

वसई विरार महापालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसांठी एकूण 115 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. शुक्रवारी विरार येथे आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अनेक दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग महिलांचे झाल्याने त्यांना नगरसेवक पदाला मुकावे लागणार आहे

वसई विरार महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक जून 2020 रोजी होणार आहे. 2001 च्या लोकसंख्येनुसार यंदा 115 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्या प्रभागांच्या महिला आणि इतर मागासवर्गीयंच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात पार पडली.

यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी तथा वसई विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ कैलास शिंदे उपस्थित होते. सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती-जमातींचं आरक्षण जाहीर केल्यानंतर सोडत पध्दतीने महिला, ओबीसी यांचं आरक्षण काढण्यात आलं. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला होता

अनुसूचीत जाती-जमातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर 2010 आणि 2015 च्या निवडणुकांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींचे प्रभाग वगळले. त्यानंतर एकूण 10 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.

त्यातील महिलांसाठी प्रत्येकी 3 प्रभाग आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत.

इतर मागासवर्गींयांसाठी (ओबीसी) 31 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.

16 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

यामुळे खुल्या वर्गासाठी केवळ 28 प्रभाग शिल्लक राहिले आहेत.

प्रभाग रचनेत सर्वसाधारण खुल्या वर्गातील महिलांसाठी 36 प्रभाग आरक्षित करण्यात आले.

इतर मागासवर्गीय महिला 16 आणि अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक 3 मिळून एकूण 58 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत.

जाहीर झालेल्या सोडतीचा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी स्वागत केला जरी असला तर दुसरी कडे शिवसेने या सोडतीवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार करून जाब विचारण्याची भूमिका घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *